Friday, January 29, 2021

नवीन इमारतीचे उद्घाटन

 शिक्षणाधिकारी(प्रा.) डॉ. सुचिता पाटेकर  मॅडम यांच्या शुभहस्ते जि.प.प्रा. शा. उखळद(उर्दू) शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन



       आज दि 28/01/2021 रोजी  शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.सुचिता पाटेकर मॅडम यांच्या शुभहस्ते परभणी तालुक्यातील असोला केंद्रात उर्दू माध्यमाची एकमेव शाळा जि.प.प्रा.शा.उखळद (उर्दू) च्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

कोविड-19 मुळे गेल्या मार्च पासुन बंद असलेल्या शाळा इ 5वी ते 8वी शासन आदेशानुसार काल दि. 27/01/2021पासुन सुरु करण्यातआल्या. मा.मॅडम यांनी कोविड काळातील शाळेची शै.स्थिती जाणुन घेतली.  

*शाळा बंद पण ,शिक्षण चालु, चला शिकुया प्रयोगातून विज्ञान,शै.अभ्यासगट, दुरदर्शन वरिल टिली-मिली कार्यक्रम, गुगल क्लास, इत्यादी माहिती आदर्श शिक्षक श्री.शेख मुंतजीब सरांनी दिली* .

          इयता 5वी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा संबंधीचे नियोजन श्री अफरोज सरांनी  सांगितले.        

   *शाळेच्या वतीने शिक्षणाधिकारी डाँ पाटेकर मँडम यांचा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मुजीब खान यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व  मॅडमच्या उर्दू विषयी आवडीनुसार  "आओ उर्दू सिखे"  हे पुस्तक मुंतजीब सरांनी भेट दिली*.

   श्री मुरतुझा सर व श्री सय्यद खाजा हुसेन सरांनी ज़ेष्ठ शि.वि.अ. श्री.कापसीकर साहेब व केंद्रप्रमुख श्री दत्ता गायकवाड सर  यांचा पुष्पगुच्छ, शाल व पुस्तक देऊन स्वागत केले.

        *शिक्षणाधिकारी मॅडम व सर्व मान्यवरांनी शाळेचा भौतिक परिसर स्वच्छता, सुविधा यांचे खूप कौतुक केले मॅडमनी स्वतः सर्व शिक्षकांचे  वैयक्तिक सत्कार केले व शाळेची इमारत रंगरंगोटी व डिजिटल वर्ग यांचे भरभरून कौतुक करताना सांगितले की अशी उर्दू माध्यमाची शाळा जिल्ह्याभरात मी कुठे ही बघितली नाही या शाळेत खूप छान काम चालू आहे ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे  की अशी उर्दू माध्यमाची शाळा माझ्या जिल्ह्यात आहे*.

     मॅडम यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

    शिक्षणाधिकारी मॅडम यांनी इयता 5वी ते 8वी च्या सर्व वर्गास भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.सर्वानी मास्क व सँनिटायझरचा वापर केलेला होता हे पाहून मॅडम खुश झाले.

  या वेळी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कापसीकर साहेब, असोला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दत्ता गायकवाड सर, शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्री. मूजीब खान, सदस्य श्री सय्यद अब्बास पटेल, श्री सय्यद मौजूद, मु.अ.श्री मुरतुझा सर ,  श्री सय्यद खाजा हुसेन सर,श्री शेख ईसा सर, श्री शेख मुंतजीब सर,श्री शेख रफी सर, श्री अखिल सर,श्री अफरोज सर, श्रीमती रुही मॅडम, श्रीमती नूजहत मॅडम, श्रीमती शमीम मॅडम  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment