Wednesday, January 20, 2021

 "भारतरत्न  🏵️  पुरस्कार " मिळालेले पहिले अभारतीय

खान अब्दुल गफार खान

20 जानेवारी पुण्यतिथी


        खान अब्दुल गफारखान (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांता तील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्या मध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. ही संघटना "सुर्ख पोश"यानावाने देखील ओळखली जात होती. अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे चांगले मित्र होते, ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गॉंधी’ चा नावाने संबोधले जायचे.खुदाई खिदमतगारचा यशा मुळे ब्रिटिश सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले. बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारताच्या फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली.खानअब्दुल गफार खान यांना आझाद आणि धर्मनिरपेक्ष असा भारत देश पाहिजे होता,खुदाई खिदमतगारची स्थापना महात्मा गॉंधींचा अहिंसा आणि सत्याग्रह सारख्या सिद्धांता वरून प्रेरित होऊन केली गेली होती. ह्या संघटनेमध्ये साधारणतः १,००,००० सदस्य सामील झाले. आणि त्यांनी शांततापूर्वक इंग्रज पुलिसांचा विरोध केला.

No comments:

Post a Comment